Lokmat Political | एकत्रित निवडणुका घेणे अवघड | माजी राष्ट्रपती Pranab Mukherjee ह्यांचे प्रतिपादन

2021-09-13 0

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलते झाले आहेत. ते म्हणाले की ह्या दोन्हीही निवडणुका एकत्र घेणे अत्यंत कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कल्पना मांडली आहे. या निवडणुका कृत्रिमपणे एकत्रित घेतल्यास राज्यांना त्यांचा प्रातिनिधिक सरकारचा अधिकार नाकारला जाईल, असा युक्तिवादही मुखर्जी यांनी केला आहे.मुखर्जी यांनी व्यक्त केलेले हे मत ते राष्ट्रपतिपदी असताना केलेल्या मताच्या विरोधी आहे. किमान दोन वेळा त्यांनी एकत्रित निवडणुकांना पसंती दर्शविली होती. शिक्षक दिनानिमित्त २०१६ मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुखर्जी म्हणाले होते की, सातत्याने निवडणुका झाल्यास त्याचा सरकारच्या नियमित कारभारावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी सामूहिकपणे निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले होते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires